स्वामीराज माऊली गुरु !!
योगीराज माऊली गुरु !!तु माय मी लेकरू कृपेचा पान्हा लागे झरू
पोटाशी घेतलेस आई !! नेत्र लागले भरू
दे तुझी कृपा साऊली !! माय माऊली
हा स्वामी माझा श्वास !! हा स्वामी माझा ध्यास
भेटी साठी स्वामी माऊली !! तान्हा कासावीस
तुझी साद आज ऐकली !! माय माऊली
या हृदयाच्या गाभारी !! गाते ही एकतारी
भूक लागली तुझ्या कृपेची !! म्हणूनी आलो व्दारी
🙏मी डोळीयांनी पाहिली..माय माऊली🚩🚩
🌺जय जय स्वामी समर्थ 🌺
Comments
Post a Comment