Skip to main content

थोडे थांबा ना बाप्पा थोडे बसा ना

आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का थोडे थांबा ना बाप्पा थोडे बसा ना  🌺🍃👏👏                     

       
बाप्पा पाठ ठेवू त्यावर येऊन बसा ना
आंघोळ घालून मला तुमची पुजा करू द्या ना
थोडे थांबा ना बाप्पा थोडे बसा ना🌼🍃👏👏

बाप्पा पाय पुढे कराना त्यावर दुध घालू द्या ना
त्या पायाचे तिर्थ थोडे मला पिऊ द्या ना
थोडे थांबा ना बाप्पा थोडे बसा ना🌺🍃👏👏

बाप्पा कपाळ पुढे कराना त्यावर गंध लावू द्या ना
डोक्या; वरती एक फूल मला ठेवू द्या ना
थोडे थांबा ना बाप्पा थोडे बसा ना🌺🍃👏👏

शांत बसा बाप्पा हलू नका ना
तुमचे रूप डोळे भरुन मला पाहू द्या ना
थोडे थांबा ना बाप्पा थोडे बसा ना🌺🍃👏👏

बाप्पा थोडे उभे; मला दर्शन घेऊ द्या ना
प्रसाद देतो हळूच खाऊन घ्या ना
थोडे थांबा ना बाप्पा थोडे बसा ना🌺🍃👏👏

सेवा घडू द्या ना तुम्ही गोड मानून घ्या ना
रोज येऊन मला तुम्ही दर्शन देत जा ना
थोडे थांबा ना बाप्पा थोडे बसा ना🌺🍃👏👏

🎻स्वरा🎶अजित 👏

https://youtu.be/swfrhf1hczI

Comments

  1. To write a beautiful post it is very important to write a beautiful container and have prepared a very good design and I got a lot of inspiration from your post and I would also like to post like you in my life.


    Gurgaon New Hotel
    Enjoy your Night
    Gurugram Dating Girls

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तूच सूर ठावा मजसी

"तूच सूर ठावा मजशी तूच एकतारी, सगुण रूप दावी देवा एकदातरी... ||धृ|| रंभ तूच यशकीर्तीचा जीवनी गणेशा, दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा, तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||1|| लाल फुल दूर्वा शमी मी तुला प्रिय व्हावे, अष्टगंध सिंदुर बनूनि तुला मी रे पहावे, उभा जन्म झिजुदे माझा चंदनापरी 🍃 , सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||2|| https://youtu.be/09hDtNBk1aE शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे, नादमधुर तालासंगे स्वरंप्रिय व्हावे, तान घेता मधूनि एक तूच सावरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||3||" गीतकार :- सौ. स्मिता म्हात्रे,   संगीतकार आणि गायक :- अजितकुमार कडकडे . 

अनिमिष लोचनांनी वाटे तुला पाहावे

अनिमिष लोचनांनी वाटे तुला पाहावे अनिवार ओढ ज्याची त्याला उरी जपावे नयनें तुझी सुरेख आशय का जलाचे डुलती तयात स्वप्ने की ताटवे फुलांचे बनुनी झुळूक मंद गंधास;; मी वहावे अधरी तुझ्या फुलावे चैतन्य पाकळी चे 🍃 स्मित लाडके लपावे गालात चांदणीचे घनदाट सावल्यांनी केसामध्ये रूळावे सहवास सौख्य दायी वाटे जिवा हवासा ह्रदयी अखंड प्रेम देई तुझा मला दिलासा धुंदी तृप्तीच्या मी तव चिंतणी रमावे सिंहासनी मनाच्या अभिक्षीक्त तु राजा ह्रदयात तेवनारा मार्गस्थ तु दिप माझा तव संगती सुखाचे साम्राज्य मी लुटावे 🎶🎻स्वराअजित https://youtu.be/NC185lXkQ9s