🌺👏चरणी गजानना च्या मन आज दंग झाले
भवताल च्या जगाचे लोपून बंध गेले 🎶🎻
कन कन तुझा प्रभू रे विश्वात व्यापलेला
बाहेर अंतरंगी गणराज सांठलेलागंधात श्रीरूपा च्या आयुष्य हे नहाले
हा रोम रोम माझा आनंद कंद ल्याला
प्राणात आज सार्या ओंकार नाद भरला
देवा तुझ्या ठायी सुख दुःख निमाले
गणनाथ परशुधारि; भक्तास तु सहारा
चरणी तुझ्या दयाळा लाभे मला सहारा
ओढ स्वरूप माझ्या ह्रदयात बिंबलेले
Comments
Post a Comment