आत्मा तु आनंद तु ♩
नाद वेद पडसाद तु ♩जगी भांडते अजानते पण
मायेची ही नुरली पखरण
व्याकुळला जिव हा तुज वाचुन
श्वास तु, ध्यास तु, वेदनांचा नाश तु 🍃🌹
मुक्त व्हावे बंधनातुन
नातीगोती जावी विसरून
पायावरती घेता लोळन
स्वप्न तु,सत्य तु,जिवनाचा अर्थ तु 🍃🌹
अथांग सागर भव्य नभांगण
तुझी कृपा ही विशाल त्याहून
जगता जिवन ये संजीवन 🌱
जिवन तु, किरण तु, जन्म स्थिती मरन तु 🍃🌹
आत्म रूपाने आत्मीयता ही
आनंदाच्या भाव प्रवाही
तुझ्या कृपेची देत ग्वाही
ओढ तु, भाव तु, बंधनांचा बांध तु 🍃🌹
Comments
Post a Comment