|ते वाट कृपेची करी तू, ते दिशा स्नेहेची भरी तू जीवातळी आन्धुरे तू, आपला जीव || #असा आहे संतांचा सर्वाकृती कळवळा. पंढरीच्या विठ्ठलाचा नाम-गजर करत करत प्रेम भक्तीचा सोपा मार्ग या कृपावंतांनी महाराष्ट्राला दाखवला. ज्ञानेश्वर माउलींनी या वाटेवर अमृताचा सडा शिंपला आहे. यज्ञ-याग नको, जप-ताप नको, षोड-शोपचारांची पूजा देखील नको. नुसतं देवाचं नामस्मरण केलंत तरी मोक्षाचा मार्ग सोपा होईल हि शिकवण आपल्याला ज्ञानदेवांनी दिली. || कलियुगे उद्धार हरीच्या नामे || असं संत तुकारामांनीही म्हटलेलं आहे. देवाचं नाव उच्चारायचे देखील श्रम नको असले तरी चालेल. पण आपला देह, मन, बुद्धी, आत्मा, सारांश, आपलं सारं काही ईश्वरार्पण समझुन देवाच्या दारी क्षणभर जरी उभे राहाल ना, अरे एवढी साधना झाली तरी पुरे आहे. ती विठाई माउली तुमचं बोट धरून तुम्हाला मुक्तीसोपानावर घेऊन जाईल. हे आश्वासन देण्याकरता ज्ञानदेव म्हणाले, || देवाचिये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या || 🌼🌿 हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा।एल ...