"तूच सूर ठावा मजशी तूच एकतारी, सगुण रूप दावी देवा एकदातरी... ||धृ|| रंभ तूच यशकीर्तीचा जीवनी गणेशा, दुःख तिमिर दाटून येता तूच किरण आशा, तूच मूर्त मांगल्याची जपावी उरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||1|| लाल फुल दूर्वा शमी मी तुला प्रिय व्हावे, अष्टगंध सिंदुर बनूनि तुला मी रे पहावे, उभा जन्म झिजुदे माझा चंदनापरी 🍃 , सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||2|| https://youtu.be/09hDtNBk1aE शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे, नादमधुर तालासंगे स्वरंप्रिय व्हावे, तान घेता मधूनि एक तूच सावरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी ||3||" गीतकार :- सौ. स्मिता म्हात्रे, संगीतकार आणि गायक :- अजितकुमार कडकडे .
Comments
Post a Comment