Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

बा रे पांडुरंगा केव्हा भेटदेशी

बा रेऽ पांडुरंगा केव्हा भेटदेशी झालो मी परदेशी । तुजविण ओवाळावी काया । चरणावरोनी केव्हा चक्रपाणी । भेटशील तुका म्हणे माझी पुरवावी आवडी वेगें घाली उडी नारायणा -संत तुकाराम संगीत - वझेबुवा स्वर - पं. अजितकुमार कडकडे (संन्याशाचा संसार या नाटकासाठी हे अभंग संगीत बद्ध केलेलं आहे.) https://youtu.be/XtPn_2eAphc

तुझ्या चरणी तुझीया मंदिरी सुखात मी भगवंत

तुझ्या चरणी तुझीया मंदिरी सुखात मी भगवंत 🌺 मला रे हवी कशाला खंत🌸🙏 तुझ्या चरणी.....🎶 तुझ्या पुजेचा नित्य सोहळा सदा सर्वदा पाहिन डोळा नाम घोष तव कानी 🎶पडता घडते पुण्य अनंत 🙏 मला लाभली तुझी पायरी कशास येऊ मी गाभारी🌺🌸 जाता येता स्पर्शुन जाती सगळे संत महंत🙏🚩 तुझ्या दर्शना येतील कोणी तिर्थपदी चे प्राशील कोणी🌺 अर्धा उष्टा थेंब सांडिता नुरेल माझी खंत 🙏 🎶स्वराअजित🎻 Lyrics - Ramesh Sule Music - Ashok Patki Singer - Ajitkumar kadkade https://youtu.be/B3LTlOMRISg

परिमळाची धांव भ्रमर ओढी

परिमळाची धांव भ्रमर ओढी।☘ तैसी मज लागो तुझी गोडी ॥१॥ अविट गे माय विटेना। जवळींच आहे परि भेटेना ॥२॥ तृषा लागलिया जीवनातें ओढी । तैसी तुझी गोडी लागे या जीवा ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलीं आवडी । गोडियेसी गोडी मिळोनि गेली ॥४॥ https://youtu.be/SmDYneZu3w8

सुखाचें हे सुख श्रीहरी मुख

सुखाचें हे सुख 🌷श्रीहरी मुख । पाहतांही भूक तहान गेली ॥१॥ भेटली भेटली विठाई माऊली ।🙏 वासना निवाली जिवांतील ॥२॥ चंद्रासी चकोर मेघासी मयूर । वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥ #नामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले । जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥ 🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿

जगत तारिनी वरद मोहिनी

जगत तारिनी वरद मोहिनी 🌸🍃 तुच अंबिके महं:मगले 🌸🍃 मोहिनी मोहिनीऽऽ....जगत तारिनीऽऽऽऽ🚩 निज रूपाचे आज कसे तव 🍃🌸 हिमनग जनु ते भान .हरपले 🍃🌸 एक एका तव अश्रू बिंदू ने 🍃🌸 शौर्याचे शत यज्ञ पेटले..🍃🌸 मोहिनी मोहिनी ऽऽऽऽ॥ जगत तारिनी वरद मोहिनीऽऽऽऽऽ🚩 तु दुर्गा तु असुर मर्दिनी 🍃🌸 तेजो बल तव कुठे लोपले🍃🌸 जगत तारिनी वरद मोहिनीऽऽऽऽऽ🍃🌸 नाटक - संगीत अमृत मोहिनी https://youtu.be/WEXreMYY1Q4

मानिली आपुली तुजसि मीं एकदां

मानिली आपुली तुजसि मीं एकदां । दुःख शोक न कदा शिवुत तुजलागि तें ॥ वंचिलें त्वां जरि हितचि तव वांच्छितों । वरुनि सन्मार्ग तो धरिं सदा सुमतिते ॥ कष्ट जरि सोशितां वच न ये मोडितां । म्हणुनि जातों अतां गाळि नयनाश्रु ते ॥ ✒गोविंद बल्लाळ देवल (मास्तर) 🙏 नाटक - संशय कल्लोळ 🎻🎼 https://youtu.be/XhBannrSDxw

शोभते सुंदर ध्यान लंबोदर

शोभते सुंदर ध्यान लंबोदर रूप निरंतर जागवू या . रंगुया स्मरणी रंगुया किर्तनी एक नाम कानी मोरया मोरया🌺 वाहुनिया दुर्वा करू तुझी सेवा सुखाचा तु ठेवा गणराया वेदांचा तु वेद नादाचा तु नाद 📖🌺🍃🎻🎶🌷🍃🎹 अनादी अनंत आठवुया 👇 https://youtu.be/Bjz_2P54L7c

सुकांत चंद्रानना

सुकांत #चंद्रानना पातली भ्रूधनु सरसावुनी ॥ कटाक्ष खरशर सोडुनि भेदित हृदयचि #गजगामिनी ॥ रदन दिसति जणुं #शशिबिंबाचे खंड मुखीं खोंविले कुरळ केश शिरिं सरळ नासिका नेत्र कमलिनीदलें गीत-गो. ब. देवल 🎻🎼 संगीत संशयकसंशयक