Skip to main content

Posts

अनिमिष लोचनांनी वाटे तुला पाहावे

अनिमिष लोचनांनी वाटे तुला पाहावे अनिवार ओढ ज्याची त्याला उरी जपावे नयनें तुझी सुरेख आशय का जलाचे डुलती तयात स्वप्ने की ताटवे फुलांचे बनुनी झुळूक मंद गंधास;; मी वहावे अधरी तुझ्या फुलावे चैतन्य पाकळी चे 🍃 स्मित लाडके लपावे गालात चांदणीचे घनदाट सावल्यांनी केसामध्ये रूळावे सहवास सौख्य दायी वाटे जिवा हवासा ह्रदयी अखंड प्रेम देई तुझा मला दिलासा धुंदी तृप्तीच्या मी तव चिंतणी रमावे सिंहासनी मनाच्या अभिक्षीक्त तु राजा ह्रदयात तेवनारा मार्गस्थ तु दिप माझा तव संगती सुखाचे साम्राज्य मी लुटावे 🎶🎻स्वराअजित https://youtu.be/NC185lXkQ9s