माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे! व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे! कधी ऐकतो गीत झर्यातुन वंशवनाच्या कधी मनातुन कधि वार्यांतुन, कधि तार्यांतुन झुळझुळतात तराणे! गा विहगांनो माझ्यासंगे सुरांवरी हा जीव तरंगे तुमच्यापरी माझ्याहि सुरांतुन उसळे प्रेम दिवाणे!