Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

शांतादुर्गा तुला शोधण्या आली गोमांतकी

  शांतादुर्गा तुला शोधण्या आली गोमांतकी  ऊठी मंगेशा हे जगदीशा भार्या तव लाडकी ॥धृ.॥ स्वर्गासम ही सुरम्य भासे गोवा हा भुवरी | समीर गंधीत उधळीत येई कैवल्याच्या सरी परशुराम तो पद स्पर्शाने परिसर पावन करी सोडा रुसवा शंभू देवा झोप तुझी नाटकी | शंभू शांधवीं शिव शक्ती ची मुळ रूपे असती अलग अलग मग तया मागणे अवघड होई किती दैवताचा हा खेळ थांबवा भ्रमीत जाहली मती पशुपतीनाथा सत्वर आता जाग करा बोलकी अद्न्य जीवही तुझीच बाळे सदा लीन होती मांगिरीश हा गोमांतटीचा सदैव मनी पुजीती श्रध्दा भक्ती अर्पण करूनी मुक्ती तुज मागिती द्याहो दर्शन भक्ता आता काही नच आणखी | https://youtu.be/8P-4ZPJq93w